विरार अलीबाग महामार्ग बोर्ले सांगडे बेळवली व पालीखुर्द बाधितांची सीबीडी येथे यशस्वी बैठक

 अन्यथा येथील शेतकरी एक ही इंच जमिन या महामार्गाला  देणार नाहीत.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनील पाटील

मा.प्रांत अधिकारी,पनवेल श्री राहुल मुंडके साहेब व एमएसआरडीसी चे अधिकारी व दि.१७ डिसेंबर २०२१ रोजी उपोषण कर्त्यांचे शिष्टमंडळ  याचे सोबत बोर्ले,सांगडे ,बेलवली व पालीखुर्द  हि गावे विरार- अलिबाग महामार्गातून वाचविण्या बाबत सकारात्मक चर्चा होऊन  त्या बाबत दि.३० डिसेंबर २०२१  एमएसआरडीसी चे अधिकारी यांचे सोबत बेलापूर येथे बैठक घेऊन चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरले होते त्या नुसार  एमएसआरडीसी चे मा.अधिक्षक अभियंता ,श्री सुनिल देशमुख,का.अ.श्री वाडकर,उप.का.अ‌. श्री महाडीक व त्यांची एजन्सी व उपोषणकर्ते शेतक-यांचे शिष्टमंडळ यांचे सोबत आज दिं.३० डिसेंबंर २०२१ रोजी दु.३.३० वा.बैठक सपंन्न झाली .

  त्यावेळी एमएमआरडीए चे अधिका- यानी जी माहीती एमएसआरडीसी ला पुरवली ती प्रोजेक्ट वर किती घरे  ,गावे बाधित होत आहेत दाखवीली त्यानंतर शिष्टमंडळाने सदर नविन आखणी हि येथिल या चार गांवांतील शेतक-यानी हजारो  हरकती घेतल्याने नियोजन अधिकारी सिडको,नैना,MMRDA यानी शेतक-यांचा समवेत संयुक्त पाहणी केल्यानंतर या नियोजन अथॉरिटीने तो बदलून ही चार गावे वाचवून नवीन आखणी केली व ती संबंधित कार्यालयाना सादर केली.तसेच ही चार गावे वाचविण्यासाठी शासनाने छाननी अहवाला नुसार समंती दर्शिवलेली आहे त्याची अमंलबजावणी करावी तसेच MSRDC चे अधिकारी यानी सांगीतल्या नुसार इंटरचेंज रस्त्यांचा या चार गांवांचा काहीही संबंध नाही.

.त्याची अधिसुचना काढण्यात आली नाही,हरकती मागीतलेल्या नाहीत .आपण फक्त विरार - अलिबाग ४५० फुट रुंदीच्या महामार्गातील   या चार गांवांतील नवीन व जुन्या महामार्गात किति घरे गावे व गावे उध्वस्त होत आहेत  तो अहवाल सादर करावा .व सिडको,नैना व MMRDA ,ने हि चार ही गावे वाचवली आहेत त्याची अमंल बजावणी करावी अन्यथा या चारहि गांवांतील शेतकरी एकही इंच जमीन या प्रकल्पाला देणार नाही असे सर्वानी ठणकावून सांगीतले. त्या वेळी MSRDC चेअधिकारी यानी नवीन आखणीचा सर्व्हे करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी ,रायगड याना देऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले.

  या सभेत ९५ गाव नवी मूबंई,नैना व इतर प्रकल्प समितीचे अध्यक्ष,ॲड.सुरेश ठाकूर साहेब,सचिव श्री संतोष पवार विरार अलिबाग कॉरिडॉर कृती समीतीचे अध्यक्ष श्री सुरेश पवार, मा.नामदेवशेठ फडके सा. श्री वामन शेळके,श्री बळीराम भोपी श्री गोविंद पाटील श्री बबन पवार श्री एकनाथ पाटील,श्री अनिल भोपी श्री नरेन्द्र भोपी.श्री बाळाराम फडके श्री डि.के भोपी व इतर सर्व शेतकरी यानी या बैठकित चर्चेत भाग घेऊन सदर ही चारहि गावे वाचवावीत असे MSRDC चा अधिका-याना ठणकावून सांगीतले अन्यथा येथील शेतकरी एक ही इंच जमिन या महामार्गाला  देणार नाहीत.


Post a Comment

Previous Post Next Post