पुण्यातही 500 चौरस फुटा पर्यंतच्या मिळकत धारकांना महापालिकेनी कर माफी करावी

माजी आमदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांची पत्रकाद्वारे मागणी.

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

जिलानी (मुन्ना) शेख :

 पुणे :   सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पुण्यातही 500 चौरस फुटा पर्यंतच्या मिळकत धारकांना महापालिकेनी कर माफी करावी,अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.  मुंबई  महापालिकेने  500 चौरस फुटांच्या घरांचा मिळकत कर रद्द केलेला आहे. त्या धर्तीवर पुणे महापालिकेनेही  मिळकत कर रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने यापूर्वीच केलेली होती. महापालिकेतकर सवलतीचा ठरावही मांडला, मंजूर झाल्यावर राज्य शासनाकडे  पाठविला होता. पन्नास हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन तत्कालीन मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते, अशी माहिती मोहन जोशी, संजय बालगुडे यांनी दिली .

Join our Whatsapp Group,  Twitter and facebook page for every update.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे लोकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे, त्यातही औषधोपचारांवर बराच खर्च झाला आहे. यातून लोकं अद्याप सावरलेले नाहीत तोच परत कोरोनाची तिसरी लाट ओमायक्रॉन या साथींनी डोकं वर काढलं आहे. या परिस्थितीत पुन्हा निर्बंध येणे अटळ आहे. लोकांच्या हातात पुरेसे उत्पन्न नाही. त्यातच मिळकत कर भरण्याचा बोजा त्यांना सोसवणारा नाही. त्यामुळे ५००चौरस फुटा पर्यंतच्या मिळकतीवरचा कर रद्दच करण्यात यावा, अशी मागणी मोहन जोशी आणि संजय बालगुडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

महापालिकेचे उत्पन्नयंदा डिसेंबर महिन्यातच उद्दीष्टापेक्षाही वाढले आहे, २०२१मध्ये बांधकाम क्षेत्राला चालना मिळाल्याने पालिकेचे उत्पन्न ४००कोटीहून अधिक वाढले असून मार्च पर्यंत ते अधिक वाढेल हे लक्षात घेऊन महापालिका करमाफी देऊ शकते. अशा करमाफीतून महापालिकेवर फार मोठा आर्थिक बोजा पडणार नाही. ही बाब लक्षात घ्यावी, असेही मोहन जोशी, संजय बालगुडे यांनी पत्रकात म्हटले आहे

Post a Comment

Previous Post Next Post