प्रवासी वाहतूक ॲपकंपनीच्या कट-कारस्थानामुळे रिक्षाचालकांच्या पोटावर पाय

 संबंधित खात्याने व राज्य सरकारने डोळे उघडावेत.


प्रेस मीडिया ऑनलाईन :

 पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

रिक्षाचालकांचा संघर्ष फक्त पोट भरण्यासाठी आहे. रिक्षाचालकांच्या परिवाराला दोन वेळची भाकर मिळावी म्हणून रिक्षा चालक शासनाचा परवाना घेऊन रस्त्यावर संघर्ष करत आहे. रिक्षाचालकांना शासनाने परवाना देऊन प्रवासी वाहतूक करण्याचा,हक्क वा अधिकार दिलेला आहे .

 

.

या व्यवसायातून रिक्षाचालक आपल्या घरचा गाडा ओढत आहे तो काही बंगला बांधत नाही किंवा माडी बांधत नाही किंवा मोठा श्रीमंत होत नाही फक्त दोन वेळची भाकर मिळावी एवढीच  रिक्षाचालकांना अपेक्षा असते, या बाबत प्रेस मीडिया वृत्तसेवेच्या पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली यांनी आज शहराच्या विविध भागांमध्ये रिक्षावाल्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

 प्रवासी वाहतूक ॲपकंपनीच्या कट-कारस्थानामुळे रिक्षाचालकांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न होत आहे, दुचाकी टॅक्सी प्रवासी वाहतूक बंद व्हावी कंपनी ने दुचाकी टॅक्सीचा ऑप्शन ॲप मधून काढून टाकावा ,पुणे शहरात व पिंपरी-चिंचवड शहरातून प्रत्येक रिक्षावाला अशीच प्रतिक्रिया देत आहे. 

पुणे जिल्ह्यात लाखोच्या संख्येने रिक्षावाले आहेत परंतु त्यांचा आवाज शासनाच्या कानात केव्हा जाणार..? सरकार कडून प्रवासी वाहतूक ॲप कंपन्यांना दुचाकी टॅक्सी बंद करण्याचे  आदेश  केव्हा मिळणार व अमल बजावणी कधी होणार याकडे लाखो रिक्षावाल्यांचे डोळे लागून आहेत. सरकारने आपल  डोळे उघडुन सकारात्मकता दाखवत रिक्षा व्यवसायाला व लाखो रिक्षाचालकांच्या परिवाराला वाचविण्यासाठी तत्परतेने या प्रकरणावर लक्ष घालून रिक्षावाल्यांना न्याय द्यावा अशीच जोरदार मागणी आज प्रत्येक रिक्षा चालकांकडून होत आहे. 


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post