शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने समाजा मध्ये

 उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  

प्रेस मीडिया ऑनलाइन :



 कै. बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट, बेडकिहाळ बेळगाव जिल्हा या संस्थेच्या वतीने समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी जनांना पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भाषण डॉ. विक्रम शिंगाडे यांनी केले.                   



त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ एन. एम. साली जानपद विश्वविद्यालयाचे कुलगुरू, हावेरी हे लाभले होते. बोलताना ते म्हणाले की मी डॉ. विक्रम शिंगाडेचे कार्य गेली सात वर्षापासुन पाहत आहे. असा प्रमाणिक सामाजिक कार्यकर्ता मी कुठेच पाहिला नाही. मी कुलगुरू असुन मला एवढे कार्य करता येत नाही. पण शिंगाडे एक सामान्य व्यक्ती असुन एवढे सामाजिक कार्य करीत असतात. या कार्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली योग्य व्यक्तीला ही पदवी मिळाली  याचा आम्हाला अभिमान आहे.त्यांचे कार्य पाहुण मला असे वाटते की देवाने मला पुढच्या जन्मी शिंगाडेच्या पोटी जन्म घालावा.असे ते म्हणाले. प्रमुख मार्गदर्शक प्रकाश कदम, प्रसिद्ध वक्ते व लेखक, शिक्षक कोल्हापूर यांनी मार्गदर्शन करताना डॉ. विक्रम शिंगाडेंच्या 20 वर्षांचा सामाजिक कार्याचा पाढाच सांगितला. सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतात, रक्तदान शिबिर आयोजित करतात, महाआरोग्य शिबीर आयोजित करतात,लेक वाचवा अभियान राबवितात, पर्यावरणाचे रक्षण  अभियान राबवितात, सर्व महामांनवांचे जयंती साजरी करतात, अनेक गरीब गरजू लोकांना नेहमी मदत करत असतात, अनेक विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण स्वखर्चाने करून देत असतात. अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फी ते भरत असतात, कोरोना परिस्थिती मध्ये त्यांनी 200 कुटुंबांना अन्नधान्याची व्यवस्था एक महिना पर्यंत करुन दिली होती.अनेक शासकीय योजना गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचवुन त्यांना मदत करत असतात. समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी जनांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान पुर्वक गौरव करत असतात. असे अनेक उपक्रम ते नेहमी राबवत असतात. त्यांच्या कार्याला माझा सलाम असे ते म्हणाले. प्रत्येक गावा-गावा मध्ये एक विक्रम तयार व्हावा असे ते म्हणाले.              


 त्यावेळी डॉ.शरनप्पा मुष्ठीगेरी, प्राध्यापक धारवाड, बाळासाहेब पाटील, आयुर्वेदिक औषध उधोजक, इचलकरंजी, अशोक झेंडे, ग्राम विकास अधिकारी बेडकिहाळ, रविकांत सर, ग्राम विकास अधिकारी गळतगा,   सुनिल जाधव.शिक्षक व साहित्यिक राजापुर, जी एस वर्धन.सामाजिक कार्यकर्ते इचलकरंजी, डॉ.बाळासाहेब उदगट्टी.सामाजिक कार्यकर्ते बेळगाव, नारायण खानु मोठे देसाई, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक. कोडोली, निवास कांबळे.आर.पी.आय. अध्यक्ष इचलकरंजी, मल्लेश चौगुले.ऑल इंडिया एस.सी.एस.टी.ऑर न्यु दिल्ली अध्यक्ष, उपेंद्र बाजीकर स्मार्ट न्यु चॅनल बेळगाव जेष्ठ पत्रकार बेळगाव, सुरेश कुराडे साहित्यिक राजापुर आदि मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्काराने त्यांना शाल, श्रीफळ, फेटा, मेडल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. समाजभुषण, समाजरत्न, समाज गौरव, कलाभुषण, कलारत्न, क्रिडारत्न गौरव पुरस्कार असे एकुण 67 गुणी जनांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रंगराव बन्ने.लेखक, पत्रकार, अन्वर मुल्ला.पत्रकार, यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश या राज्यांतुन पुरस्कारकर्ते आले होते.  पुरस्कार विजेते रामनाथ पंढरी.गोवा, शिवाजी शिंदे. परभणी, सत्यजित सस्ते.सातारा,राम राजा जल्वान.उत्तर प्रदेश, उदय पांगिरे.बेडकीहाळ, शिवरत्न गणेश मंडळ, बेडकिहाळ, श्री.शिवस्वराज गणेश मंडळ, इचलकरंजी, आण्णासाहेब केरुरे. मलिकवाड, तात्यासाहेब कदम.सदलगा, सिध्दाप्पा गावडे.कारदगा, विजय संकपाळ.शमनेवाडी, शिरीष कांबळे.बेडकीहाळ, अजय अब्बार.हावेरी, सुनिल जाधव.राजापुर,ग्लोरी अरोकियन. मुंबई महेश कांबळे.नेज, ऍड थरकार सर खडकलाट, असे अनेक पुरस्कार विजेते उपस्थित होते.                                  

   त्यावेळी कार्यक्रमाचे संयोजक सौ. पुजा कांबळे, सौ.प्रिया मठपती, सतिश मठपती,प्रकाश कांबळे, रुपेश सनदी, शिरीष कांबळे, योगेश निकम तसेच कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तिन्ही राज्यातिल पुरस्कारकर्ते उपस्थित होते. हा कार्यक्रम दि- 21 रोजी बेळगाव नियाज हॉटेल हॉल येथे हा कार्यक्रम खुप आनंदी- उत्साही वातावरणामध्ये पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऍड.प्रिती हट्टीमणी यांनी केले तर आभार डॉ. विक्रम शिंगाडे मानले.

Post a Comment

Previous Post Next Post