महागरपालिका हद्दीतील अवैध मालमत्ताधारकांना

  नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन :आयुक्त राजेश पाटील.


प्रेस मीडिया ऑनलाइन :

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

पिंपरी-चिंचवड शहरात ३१ डिसेंबर २०२०पूर्वी झालेली अवैध बांधकामे नियमित करण्याची किचकट प्रक्रिया महापालिकेने सोपी आणि सुलभ केली आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध मालमत्ताधारकांना अर्ज करण्याचे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. याबाबतची सविस्तर माहिती, अर्जाचे नमुने, आवश्यक कागदपत्रे व गुंठेवारी बांधकामे नियमितीकरणाची सर्वसाधारण माहिती ही महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पूर्ण भरलेले अर्ज नागरी सुविधा केंद्रात स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांना ऑनलाइन अर्जही करता येणार आहे. 

मात्र, २१ फेब्रुवारीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही. अशी बांधकामे काढून टाकली जातील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.मालमत्ताधारकांनी मार्च २०२१ अखेर मालमत्ते करिता येणा-या नियमित कराचा भरणा करुन ना-हरकतदाखल्याऐवजी ती पावती सादर करावी. पाणीपुरवठा विभागाच्या ना-हरकत दाखल्या ऐवजी मालमत्ता धारकाने मार्च २०२१ अखेर मालमत्ते करिता येणा-या पाणी बिल रकमेचा भरणा करुन ती पावती द्यावी. जलनि:सारण विभागाच्या ना-हरकत दाखल्या ऐवजी मालमत्ता धारकाने मालमत्ते साठी घेतलेल्या ‘ड्रेनेज कनेक्शन पूर्णत्वाचा’ दाखला सादर करावा. ही माहिती बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली. नागरिकांना ‘एनओसी’साठी महापालिकेच्या विभागात फिरावे लागणार नाही त्यासाठी या कागदपत्रांमध्ये सवलत दिली असून बाकीची कागदपत्रे जोडावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.




*बांधकामे नियमितीकरणासाठी कागदपत्रे*


*विहित नमुन्यातील अर्ज

*मालकी हक्कासाठी ७/१२ उतारा व तत्सम कागदपत्रे

* मार्च २०२१ अखेर मालमत्ता कर भरल्याची पावती

* मार्च २०२१ अखेर पाणी बिल भरल्याची पावती

*‘ड्रेनेज कनेक्शन पूर्णत्वाचा’ दाखला

 * इमारतीचा प्लॅन, क्रॉस सेक्शन, इलेव्हेशन, लोकेशन प्लॅन

* नकाशावर मालक व आर्किटेक्टची स्वाक्षरी बंधनकारक

* मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी दाखला




*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post