गुटखा विक्री करणाऱ्यांवर देहूरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

 गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले , चार जणांना अटक 


प्रेस मीडिया ऑनलाईन :

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

देहूरोड पोलिसांची गुटखा विक्री करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई केल्याने सर्वत्र जोरदार खळबळ उडाली असून गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री केल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली. या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या कारवाया तळवडे येथे करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून गुटका विक्री केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास कॅनबे चौक, तळवडे येथे छापा टाकून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १० हजार  रुपये किमतीचा गुटका जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार तपास करीत आहेत.

गुटखा विक्रीच्या  प्रकरणात प्रणब धनंजय मैती वय १९, रा. कॅनबे चौक, तळवडे, दीपक बालाजी खांडरे वय २६, रा. परंडवाल चौक, देहूगाव आणि शुभमसिंह नरपतसिंग वय २५, रा.भवरलाल पुकाराम चौधरी वय ३०, रा. तळवडे  या चौघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत नारायण पवार,पोलीस कॉन्स्टेबल सचिन श्रीमंत शेजाळ  यांनी शनिवारी  देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


जाहिराती साठी संपर्क : 

पठाण एम एस : 94232 49331

Post a Comment

Previous Post Next Post