देहूरोड आणि देहू परिसरातील विविध संस्था व संघटनांतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला


प्रेस मीडिया ऑनलाइन :

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :

  देहूरोड आणि देहू परिसरातील विविध संस्था व संघटनांतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य अॅड.कैलास पानसरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. 

या वेळी देहूरोड पोलिसांनी पदसंचलन करत मानवंदना दिली. बोर्डाच्या शाळेत शिक्षिका मधुरा पंडित यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यालयीन अधिक्षक राजन सावंत, धनाजी मुळीक, विविध राजकीय पक्षांचे नेते, माजी सदस्य उपस्थित होते. सुनील गुरव यांनी सूत्रसंचालन केले.


बाजार पेठेतील ऐतिहासिक सुभाष चौकात ज्येष्ठ व्यापारी कांतिलाल पारेख यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. माजी सदस्य हाजीमलंग मारिमुत्तू, मदन सोनिगरा, अॅड. कृष्णा दाभोळे, रेणू रेड्डी, यदुनाथ डाखोरे आदी उपस्थित होते. शहर भाजपतर्फे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, आरपीआय अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी, वृंदावन चौकात सुनील चंडालिया यांनी ध्वजवंदन केले. यावेळी दीपक सायसर, पोपट कुरणे, अनिल खंडेलवाल उपस्थित होते. श्री शिवाजी विद्यालयात प्राचार्य रामदास सानप यांच्या हस्ते ध्वजवदंन झाले. यावेळी श्‍याम भोसले आदी उपस्थित होते. सॅमसन मेमोरियल रिपब्लिक हायस्कूलमध्ये संस्थापिका मोली सॅमसन यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका संयुक्ता आरेकर, आनंदा टिळेकर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post