विशेष वृत्त : पुणे रेल्वे विभागाने तब्बल १ लाख हजार वीणा तिकीट प्रवासी पकडले

 फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेने ६ कोटी १४ लाख रुपयांचा दंड वसूल केला.

       आता फुकट्या प्रवाशांचे खरे नाही..


प्रेस मीडिया ऑनलाईन : 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस


पुणे रेल्वे विभागात एप्रिल ते जानेवारी या नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल एक लाख ३७ हजार फुकटे प्रवासी पकडले आहेत. या फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेने तब्बल सहा कोटी १४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.


विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा, अपर विभागीय व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्याम कुलकर्णी, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक एस वी एन सुभाष यांच्या नेतृत्वात तिकीट तपासणी निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा विभागाने ही कारवाई मोहीम केली आहे.

पुणे रेल्वे विभागाची विविध प्रकारची कारवाई सातत्याने सुरु आहे. १ एप्रिल २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या कालावधीत पुणे रेल्वे विभागात तब्बल १ लाख 37 हजार विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांना पकडण्यात आले. या प्रवाशां कडून ६ कोटी १४ लाख रुपयांचा  दंडाची वसूली करण्यात आकेली आहे. तिकीट चेकिंगसाठी ६ कोटी रुपयांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. मागील तीन महिन्यांपूर्वीच हे लक्ष्य पुणे विभागाने पूर्ण केले आहे.

प्रवासात निश्चित वजना पेक्षा जास्त वजनाचे सामान घेऊन जात असताना त्याचे देखील तिकीट घ्यावे.अन्यथा सहापट दंड वसूल करण्यात येईल, प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन रेल्वे स्थानकावर प्रवेश आणि प्रवास करावा. विनातिकीट प्रवास केल्यास २५० रुपये दंड घेण्यात येईल. सध्या कन्फर्म तिकीट असेल तरच प्रवासाला मुभा आहे. त्यामुळे कन्फर्म तिकीट असेल तरच प्रवासाला निघावे. कन्फर्म तिकीट नसताना प्रवास करताना आढळून आल्यास अशा प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे. या पुढे फुकट्या प्रवाशांचे खरे नाही.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस 

94232 49331.

Post a Comment

Previous Post Next Post