कर्जत भीमाशंकर जोड मार्ग संघर्ष समितीची बैठक संपन्न

 संघर्ष समितीचा भीमाशंकर घाट रस्ता होईपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार




प्रेस मीडिया ऑनलाइन :

 कर्जत तालुका प्रतिनिधी : नरेश कोळंबे 

  कर्जतमध्ये अनेक वर्षांपासून भीमाशंकर पुणे रस्त्याच्या  जोड मार्गासाठी संघर्ष चालू आहे. पनवेल -नेरे - म्हाळडूनगे - नेरळ -कशेळे कोठिबे वांद्रे विराम भीमाशंकर राजगुरूनगर हया रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे यासाठी रविवार दि ९ जानेवारी रोजी भवानीमाता मंदिर कशेळे येथे कर्जत भीमाशंकर जोडरस्ता संघर्ष समितीच्या वतीने  सुनील गोगटे  किसनराव गोपाळे हे मावळचे सदस्य यांनी पुढाकार घेऊन बैठक आयोजित केली होती. यावेळी कर्जत मावळ पुणे कामशेत  येथून लोक आले होते. 

        याप्रसंगी सुनिल गोगटे यांनी प्रास्ताविक करून आज पर्यत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा रस्ता नॅशनल हायवे म्हणुन घोषित करून घेण्यासाठी काय प्रयत्न केले आणि  तत्वतः त्यास मान्यता ही मिळाली परंतु कामात अजून प्रगती नाही . कामास वेग यावा यासाठी जनरेटा वाढला पाहिजे म्हणून दोन्ही जिल्ह्यातील लोकांनी जागृत होऊन  स्वाक्षऱ्या निवेदन अश्या मोहिमा राबवून काम कसे सुरू होईल या साठी प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले.  

माधवराव गायकवाड यांनी १९६० पासून हा रस्ता प्रस्तावित असुन त्यासाठी अनेक प्रयत्न केले आता तरी रस्ता व्हावा  आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगितले. किसन राव  गोपाळेनी २००० साल पासून सुरू केलेल्या लढ्यात बाबत सांगितले तर भाई मोरेंनी आम्ही मावळवासीय सांगाल त्यापद्धतीने काम करायला तयार आहोत कर्जतवाल्या सोबत आम्ही असू असे सांगितले.  राजाराम शेळके   जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे यांनी सुध्दा सर्व पक्ष बाजुला सारून आम्हीं सर्व सहकार्य करू असे सांगितले . त्यानंतर स्वाक्षरी मोहीम पायीदिंडी जनजागृती अश्या विविध माध्यमातून काम करून संघर्ष समिती काम करेल असे ठरले.  याप्रसंगी भाजप नेते सुनील गोगटे, किसनराव गोपाळे, जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे, राजाराम शेळके , माधवराव गायकवाड, शाम भोईर, चंद्रकांत भोईर, कुंदन पाटील, चंद्रकांत पारधी, दत्ता सुतार, संजय कराळे महादेव  कोळंबे, विलास थोरवे ,संजय हरपुडे, राजेंद्र हरपुडे, निलेश पिंपरकर, दशरथ पोसाटे, अशोक कानडे, विलास श्रीखंडे, नरेश कोळंबे, बाळू हरपुडे, एकनाथ पिंगळे, रामदास घरत ,बाजीराव दळवी, मारुती जगताप, विजय कुलकर्णी, मिलिंद खंडागळे, समीर सोहोनी, मयूर शितोळे, समीर घरलुटे, सर्वेश गोगटे, बाळासाहेब शिंदे, गणेश म्हसे आणि बहुसंख्य कर्जतकर मावळवासीय उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post