कर्जत डोणे महामार्ग ताबडतोब दुरुस्त झालाच पाहिजे ;

 कर्जत  भाजपच्या वतीने आंदोलनाचा इशारा..


प्रेस मीडिया ऑनलाइन : 

कर्जत तालुका प्रतिनिधी :नरेश कोळंबे

 

 कर्जत डोणे महामार्गाचे काम मागील काही वर्षांपूर्वी झाले होते पण काही काळातच ह्या रस्त्याला खड्डे पडले आणि त्यामुळे लोकांना अपघाताला सामोरे जावे लागले. ह्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकर करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले होते परंतु ह्या रस्त्यावर कंत्राटदार यांनी रस्ता काँक्रीटीकरण असून डांबर चा वापर खड्डे भरायला केला जातो आहे याला विरोध करत आज भाजप कर्जतच्या वतीने उपविभागीय अभियंता कर्जत यांना निवेदन देण्यात आले. जर काम योग्य पद्धतीने न झाल्यास भाजप कार्यकर्ते याविरोधात आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. 

    कर्जत डोणे महामार्ग चे काम गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. हा रस्ता हायब्रीड अन्युटी मध्ये असून ठेकेदाराने दहा वर्षापर्यंत त्याची देखभाल दुरुस्ती करावयाची आहे. अनेक दिवसांपासून ह्या दुरुस्तीचे काम करण्यात यावी अशी मागणी केली गेली  होती. त्यानुसार गेल्या दोन-तीन दिवसापासून या रस्त्यावर विविध ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. पण जिथे कॉंक्रीट रस्ता आहे तिथे डांबराने खड्डे बुजवले जात आहेत हे पूर्णतः तांत्रिक दृष्ट्या चुकीचे असून ठेकेदारचा फायदा करण्यासाठी अशा पद्धतीचे काम करून घेतले जात आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. डांबर आणि काँक्रीट हे व्यवस्थित चिकटत नाही.  काही दिवसातच पुन्हा त्यावर खड्डे पडतील आणि येथे पुन्हा अपघात व्हायला पुनश्च सुरुवात होईल. म्हणून या बाबतीत त्वरित लक्ष घालून ठेकेदाराकडून योग्य पद्धतीत काम करून घ्यावे,  अन्यथा भारतीय जनता पार्टी याविरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असे निवेदन भारतीय जनता पक्षाचे वतीने उपविभागीय अभियंता कर्जत यांना देण्यात आले. 

            या प्रसंगी भाजप नेते सुनिल गोगटे, तालुका सरचिटणीस संजय कराळे, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे , युवा मोर्चा शहराध्यक्ष मयूर शितोळे,  सांस्कृतिक सेलचे विजय कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

PRESS MEDIA

Chief Editor: Mehabub Sarjekhan

Post a Comment

Previous Post Next Post