उत्तर प्रदेशमध्ये बोगस लसीकरणाचा भांडाफोड

आरोग्य विभागाची झोप उडाली 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 केंद्र सरकार कोरोना विषाणूपासून सुरक्षेसाठी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन करत असताना भाजपशासित उत्तर प्रदेशमध्ये बोगस लसीकरणाचा भांडाफोड झाला आहे. इटावा येथे केंद्रीय मंत्र्यांपासून ते संडे सिंह, मंडे सिंह नावाच्या लोकांनाही लस देण्यात आली आहे.लसीकरणामध्ये गडबड झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.

इटावामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि पियूष गोयल यांच्यासह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावाने बोगस लसीकरण प्रमाणपत्र देण्यात आली आहे. इटावा येथील प्रमुख अधिकारी डॉ. भागवत सिंह यांनी लसीकरणामध्ये घोळ झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे म्हटले. तपासाअंती दोषी आढळणाऱ्यावर कठोर करवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

12 डिसेंबर रोजी सीएचसी प्रभारी डॉ. उदय प्रताप सिंह यांच्या आयडीवर जारी करण्यात आलेल्या लसीकरण प्रमाणपत्रावर मंत्र्यांची नावे आली. ही बाब सार्वजनिक झाल्यानंतर सीएचसी आणि सीएमओ कार्यालयापर्यंत खळबळ उडाली. केंद्रीय मंत्र्यांना पहिली लस टोचवल्याचे आणि दुसरी लस घेण्यासाठी पुढील तारीखही या प्रमाणपत्रात देण्यात आली. दरम्यान, लसीकरण पोर्लटवरून केंद्रीय मंत्र्यांची लोकांची नावे हटवण्यात यावी यासाठी सीएमओ कार्यालयाला पत्रही पाठवण्यात आले आहे.

    

दरम्यान, लसीकरणामध्ये गोंधळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी उत्तर प्रदेशमध्ये मृत व्यक्तीलाही कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची बाब उघड झाली होती. तसेच अनेकांना लस घेण्याआधीच लस घेतल्याचा मेसेज प्राप्त झाला होता.

Post a Comment

Previous Post Next Post