तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा वरील पाय-यावर बसून कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन केले


 प्रेस मीडिया वृत्तसेवा :  

मावळ प्रतिनिधी : मुशीर पठाण

तळेगांव दाभाडे दि.१८ इंद्रायणी महाविद्यालयाच्या परिसरात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शनिवार दि.१८ रोजी राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाची हाक दिली होती. याला प्रतिसाद देत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा वरील पाय-यावर बसून कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन केले. सातवा वेतन आयोग लागू करणे, पगारातील फरक मिळणे यांसह २७ मागण्यांसाठी हा बंद व धरणे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मध्ये महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचार्यांना विद्यापीठाच्या विविध समितीवर प्रतिनिधीत्व मिळवणेबाबत व त्यानुसार विद्यापीठ कायदा २०१६ मध्ये दुरूस्ती होण्याबाबत नैमितक रजेचे लाभ मिळावा महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी प्रमाण संहिता १९८४ मधील ४ मधील २८ मध्ये तरतूद केले प्रमाणे नैमित्तिक रजेचा लाभ सर्वत्र समान मिळावा. अर्जित रजा ह्या सेवानिवृत्ती पर्यंत गणण्यात याव्यात याप्रमाणे अनेक मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.

कामाचा ताण वाढत आहेत राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्कृत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नियमित कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून महाविद्यालयातील पदभरती त्वरीत करावी.महाविद्यालयातील शिक्षकेत्तर पदांचा नव्याने आकृतिबंध सुधारित करणे.

एकाकी पदे भरण्यास परवानगी द्यावी. सद्या महाविद्यालयातील कार्यालयातील प्रमुख पदे प्रबंधक, अधीक्षक, मुख्य लिपीक आदि पदे रिक्त आहेत वरच्या महाविद्यालयातील सदरच्या पदावर पदोन्नती कर्मचारी उपलब्ध नाहीत. अशा ठिकाणी कार्यालयातील महत्वाची पदे भरणे आवश्यक आहेत तरी एकाकी पद भरती तात्काळ सुरू करावी. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील  तरतुदीनुसार महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचार्यांना प्रमाण संहिता १९८४ नियम दुरुस्ती करून तातडीने लागु करणे. असे सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे


जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :

 मावळ प्रतिनिधी मूशिर पठाण 94232 49331

Post a Comment

Previous Post Next Post