श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशलन स्पोर्टस कॉम्प्लेक्सच्या वतीने

  खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून त्यांच्या कलागुणांमध्ये आणखी भर पाडावी यासाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. 




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

त्यानुसार रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने १० ते १३ डिसेंबर दरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आले आहे.  या स्पर्धेचे स्पर्धेचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे चेअरमन आणि पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी उदघाटन झाले. यावेळी रायगड बॅडमिंटन संस्थेचे सचिव डेव्हिड अल्वारीस, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे सहाय्यक व्यवस्थापक श्यामनाथ पुंडे, व्यवस्थपन समिती सदस्य रवींद्र भगत, शिवा कराली, योगेश पाटील यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post