धानसरमध्ये 'आमदार प्रशांत ठाकूर चषक' क्रिकेट सामन्यांचे आयोजन

 नंदकुमार म्हात्रे यांच्या सौजन्याने धानसर गावासाठी नवीन स्टेज.


प्रेस मीडिया वृत्तसेवा

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 भाजपचे प्रभाग क्रमांक ०१ चे अध्यक्ष व माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या सौजन्याने धानसर गावासाठी नवीन स्टेज उभारण्यात आले असून त्याचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक १७ ते १९ डिसेंबर पर्यंत जय गणेश्वर क्रिकेट संघाच्यावतीने 'आमदार प्रशांत ठाकूर चषक' क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

   युवा नेते नंदकुमार म्हात्रे यांच्या स्वखर्चाने धानसर गावासाठी उभारण्यात आलेल्या नवीन स्टेजचे तसेच जय गणेश्वर क्रिकेट संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'आमदार प्रशांत ठाकूर चषक'  क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, युवा नेते नंदकुमार म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष चाहुशेठ पाटील, रमेश पोरजी, नरेश पोरजी,  माजी सरपंच सपना घरत, राजेश तांबोळी, गोमा वावेकर, जितेंद्र पोरजी, ज्ञानेश्वर पोरजी, तुषार पोरजी, डोनाल पोरजी, राकेश पोरजी, संयोग पोरजी, स्वप्नील पोरजी, बारक्या पोरजी, जनार्दन पोरजी, गौरव वावेकर, अनिल पोरजी, तेजस गोंधळी, निहाल ठाकूर, विश्वनाथ पोरजी,प्रतीक पोरजी, बंडू गोंधळी  तालुका चिटणीस सुरेश पोरजी, बुथ अध्यक्ष जितेंद्र पोरजी, ग्रामपंचात सदस्य नाना पोरजी, यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ, क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २५ हजार तर तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या संघास १५ हजार रुपये, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर,  व उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास विशेष पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते अंतिम सामन्यानंतर सन्मानित करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post