अटल बिहारी वाजपेयी यांना भाजपच्या वतीने विनम्र अभिवादन.



प्रेस मीडिया वृत्तसेवा

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माजी उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत शेळके, दौलत देशमुख, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा वर्षा नाईक, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, ज्येष्ठ कार्यकर्त्या सुहासिनी केकाणे, अमरीश मोकल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 

       श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी  जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात 'गुड गवर्नेंस डे' अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी 'गुड गवर्नेंस डे' साजरा करण्याची घोषणा केली होती. आज देखील यानिमित्ताने अटलबिहारी वाजपेयींना देशभरात अभिवादन केले जात आहे. तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post