पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या कार्यालयाला 'सील'



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

जीलानी (मुन्ना) शेख :

पुणे -पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या कार्यालयाला 'सील' ठोकण्यात आले आहे. याबरोबरच त्यांच्या कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवण्यात आले आहे.परीक्षा परिषदेच्या आयुक्‍तपदाचा अतिरिक्‍त कार्यभारही सुपे यांच्याकडे होता. 'टीईटी'त गैरव्यवहार केल्याप्रकरणी सुपे हे पोलीस कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परीक्षा परिषदेतील सुपे यांच्या कार्यालयाला आधीच कुलूप ठोकण्यात आले होते. त्यापाठोपाठ प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

परीक्षा परिषद व बोर्डात प्रामुख्याने कंत्राटी कामगारच नियुक्‍त करण्यात आलेले आहेत. सुपे यांच्या बोर्डातील चार-पाच कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही सुट्टीवरच पाठवून देण्यात आलेले आहेत. सुपे यांनी 'खास' कामासाठी स्वत: पगार देऊन खासगी त्रयस्थ कर्मचारी नियुक्त केले होते. त्यांची कोणत्याच हजेरी रजिस्टरमध्ये नोंदही नाही. या खास कर्मचाऱ्यांकडे प्रामुख्याने शालार्थ आयडीच्या प्रकरणांची कामगिरी सोपविण्यात आली होती.

Post a Comment

Previous Post Next Post