देहूरोड मध्ये मामुर्डी ते सांगवडे रोडवर मासुलकर सिटी समोर मुख्य पाईप लाईन मधून लाखो लिटर पाण्याची गळती

महापालिका हद्दीत दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना पाणी गळती कडे जल विभाग अभियंते व अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड  देहूरोड परिसरातील मामुर्डी ते सांगवडे रोडवर मासुलकर सिटी समोर मुख्य पाईप लाईन मधून लाखो लिटर पाण्याची गळती होत आहे. संबंधित पाणी पुरवठा जल तक्रार निवारण व विभागीय अधिकारी ,अभियंते काय करतात ? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे,

देशातील सर्वाधिक झापाट्यानं वाढणार शहर म्हणजेच पिंपरी-चिंचवड होय,  औद्योगिकनगरी असून पंधरा वर्षांत शहर जेवढे वाढले त्या तुलनेत पाणी साठा, पाण्याचे स्रोत,पाणी बचत,पाणी आरक्षण वाढलेले नाही. परिणामी कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा याचा त्रास नागरिकांना आणि शहराला होत आहे.अपुऱ्या पाणीपुरवठ्यास नागरिकांना सामोरे जावे लागत आहे, त्यात सद्याची परस्तीती दिवसाआड पाणीपुरवठा सायकलिंग चालू आहे.हा नागरिकांचा छळ नाही का? 

महापालिका हद्दीतील मामुर्डी सांगवडे रस्त्यावरील  मासूळकर सिटी समोरील एक भली मोठ्ठी जल वहिनी अशी फुटून रस्त्यावर वाहत आहे आणि दुसरीकडे  पाणी बचत करण्यासाठी समजूत देणारे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात  जल जीवन मिशन,जल हे तो कल हे, आणि एकीकडे लाखो लिटर पाणी वाया जात आहे,संबंधित असलेला विभागीये अभियंते, व अधिकारी या कडे दुर्लक्ष करून झोपा काढत आहे.

औद्योगिकनगरीची लोकसंख्या २२ लाखांवर गेली आहे.  दिवसेदिवस लोकसंख्येत वाढच होत आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची गळती थांबलेली नाही.आणि पाणी पुरवठयात वाढ ही झालेली नाही त्यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाचे पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष होत आहे. तरी  ह्या कडे पालिकेने तत्परतेने काळजी घ्यावी व पाणी पुरवठा विभागमार्फत शहरात होणाऱ्या पाणी गळती ला आळा घलण्याकरिता एक पथक स्थापन करण्यात यावे, यासाठी उपाय योजना करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे, पाणीगळती बद्दल तक्रार नोंदिण्यासाठी महापालिकेने जनजागृती करावी.

मनपाचा हेल्पलाईन नंबर  चालू करावा. किंवा संबंधित प्रभागाच्या (क्षेत्रिय कार्यालय ) कार्यकारी अभियंत्यांकडे पाणी गळती बद्दलची तक्रार  नोंदविण्यासाठी  जनतेला जाहीर आवाहन करावे .


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post