पियुष जैन यांच्या घरी पडलेल्या छाप्याची जोरदार चर्चा

 छापेमारीत जवळपास 284 करोड रुपये सापडले ,

आता पर्यंतची सर्वात मोठी कॅश रेड ....

प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

मुंबई :   गेल्या काही दिवसांपासून कानपूरचे व्यावसायीक पियुष जैन यांच्या घरी पडलेल्या छाप्याची जोरदार चर्चा आहे. या छापेमारीत जवळपास 284 करोड रुपये सापडले आहे.ही आता पर्यंतची सर्वात मोठी कॅश रेड असल्याचं म्हणत होते. पण आता राजस्थानमधून आलेल्या छापेमारीने सगळ्यांना हैराण केलं आहे.

आयकर विभागाने राजस्थानमध्ये इलेक्ट्रीक सामान विकणाऱ्या आणि कर्ज देणाऱ्या दोन व्यावसायिकांच्या घरी छापा मारला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या छापेमारीत 300 करोड रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. सीबीडीटीने मंगळवारी ही माहिती दिली. 22 डिसेंबर रोजी मारलेल्या छाप्यात आणि जयपूर, मुंबई, हरिद्वारमध्ये असलेल्या दोन अज्ञात समुहाची झाडाझडती करण्यात आली.

एका निवेदनात, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने म्हटले आहे की, "जप्त केलेल्या पुराव्यांच्या प्राथमिक विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की स्विच, वायर, एलईडी इत्यादींच्या निर्मितीच्या व्यवसायात अनेक युनिट्स गुंतलेली आहेत. ते करपात्र उत्पन्न कमी करण्यासाठी बोगस खर्चाचा दावा करत आहेत."

पहिल्या संस्थेकडून मिळाले 150 करोड रुपये...

आयकर विभागाच्या धोरण निर्मात्या संस्थेने सांगितले की व्यवहारांच्या पुराव्यांवरून 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न उघड झाले आहे जे उघड केले गेले नाही. त्यात दावा करण्यात आला आहे की समूहातील एका "मुख्य व्यक्तीने" 55 कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न "स्वीकारले" आणि त्यावर कर भरण्याची ऑफर दिली.

दुसऱ्या समुहा कडून ही 150 करोड रुपये...

सीबीडीटीने म्हटले आहे की, जप्त केलेल्या कागदपत्रांच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, बहुतेक कर्ज रोख रक्कमेत दिले गेले. तसेच त्यावर जास्त व्याज आकारले गेले. "या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या उत्पन्नाच्या परताव्यात आगाऊ कर्ज किंवा त्यावरील व्याज यापैकी कोणतेही उत्पन्न उघड केले गेले नाही," असे त्यात म्हटले आहे.

महत्वाची बाब म्हणजे 150 कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे पुरावे मिळाले आहे. तसेच यांच्याकडून 17 कोटी रुपयाचे नकद रक्कम आणि आभूषण देखील जप्त केली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post