सोमाटणे फाटा टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी .

 संबंधित विभागाने या बाबत त्वरित पावले उचलावीत अशी नागरिकांतून  जोरदार मागणी.

 


 प्रेस मीडिया वृत्तसेवा :

  मावळ प्रतिनिधी : एम एस पठान.

तळेगांव दाभाडे दि १८. मुंबई पुणे महामार्ग क्रमांक ४ वर सोमाटणे फाटा येथील टोल प्लाझा वर दर शनिवार रविवार लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूकोंडीमुळे होत आहे,त्यामुळे प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 तसेच देहूरोड व सोमाटणे फाटा तळेगांव ये-जा करणाऱ्या नागरिकांचे सुद्धा हाल होत आहे, नागरिक व्यापारी व सर्व्हिस करणारे यांचे वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यावर काही तरी मार्ग काढला पाहिजे वाहतूक कोंडी मध्ये  अडकून  नागरिकांना नाहक   त्रास सहन करावा लागत आहे, अशी माहिती  प्रेस मीडियाचे मावळ प्रतिनिधी पठान यांना सूत्रांकडून मिळाली आहे, तरी संबंधित विभागाने या बाबत त्वरित पावले उचलावीत अशी नागरिकांतून  जोरदार मागणी होत आहे.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क : 

 एम एस पठान  : +91 94232 49331*

Post a Comment

Previous Post Next Post