इचलकरंजी नगरपालिका महानगरपालिकेत रूपांतरचा कौन्सिल ठराव

  शासनाकडे सादर करण्याची राष्ट्रवादीची मागणी


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेेत रूपांतर करणे या विषयाबाबत कौन्सिल सभेत ठराव करून तो ठराव शासनाकडे सादर करावा या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी यांच्याकडे सादर करण्यात आले.

इचलकरंजी शहराची वस्त्रोद्योग आणि लोकसंख्या याबरोबरच उद्योगात प्रचंड मोठी वाढ झाली आहे.ती अजूनही होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक ,इचलकरंजी नगरपालिकेची स्थापना 1893 रोजी झाली.त्यात वस्त्रोद्योगामुळे सहज रोजगार उपलब्ध होत असल्याने साहजिकच शहरात दिवसें दिवस लोकसंख्येची वाढ होत आहे.त्यामुळे लोकसंख्येचा निकष पूर्ण होवून इचलकरंजी नगरपालिका ही महानगरपालिकेत रुपांतरीत होण्यासाठी पूर्णपणे पात्र असल्याचे दिसून येत आहे.

याच अनुषंगाने राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी इचलकरंजी नगरपालिका महानगरपालिकेत रूपांतर करणे या बाबत कौन्सिलला ठराव मंजूर करून तो ठराव शासनाकडे पाठवावा ,अशी सूचनाही केली होती.त्यानुसार तातडीने नगरपालिकेच्या कौन्सिल सभेत याचा ठराव संमत करून तो शासनाकडे पाठवावा अशी  मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने एका निवेदनाव्दारे नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी यांच्याकडे करण्यात आली.

या वेळी शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य ,नगरसेवक मदन कारंडे, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे, नगरसेवक उदयसिंग पाटील, संतोष शेळके ,युवराज माळी यांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post