महाविकास आघाडीची केवळ चर्चेचे गुऱ्हाळ..

 देहू नगरपंचायत निवडणुकीबाबत सर्वच मूग गिळून गप्प.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

देहूगाव - राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीची देहू नगरपंचायत निवडणुकी बाबत सर्वचजण मूग गिळून गप्प आहेत, अर्थात आघाडीचे सूत जुळेल नाही.शिवसेनाकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी चर्चा सुरू असल्याचे कॉंग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

'पीएमआरडी'च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमच्या बरोबर आघाडी केली. आम्ही त्यांच्या उमेदवारांना मदत ही केली. देहू नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर अद्याप समझोता झाला नाही, तर कॉंग्रेस पक्षाकडून आघाडीचा प्रस्ताव ही आलेला नाही. तो आल्यास देहू नगरपंचायतीची निवडणूक सोबत लढली जाईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी सांगितले.

नवनिर्मित देहू नगरपंचायतीची प्रथम निवडणूक येत्या 21 डिसेंबर रोजी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी व मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यानंतर सचिन अहिर पत्रकारांशी बोलत होते. अहिर म्हणाले की, नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांची संख्या आहे. खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार सुनील शेळके यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर आघाडी होण्यास विलंब होत आहे. निवडणुकीसाठी शिवसेनेचे इच्छुक निवडणूक रिंगणामध्ये असणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

राष्ट्रवादी-शिवसेनेशी चर्चा - कॉंग्रेस
देहूगाव - राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. 'पीएमआरडी'च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सहकार्य केले आहे. देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी वरिष्ठ पातळीवर राष्ट्रवादी-शिवसेना यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे मत देहू कॉंग्रेसचे प्रभारी निरीक्षक श्रीकृष्ण बराटे यांनी व्यक्‍त केले.

देहू नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मुलाखत व मेळावा येथील धर्मशाळा घेण्यात आले. प्रदेशसह प्रभारी उत्कर्षा रूपवते, अतुल कार्ले, पृथ्वीराज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

कॉंग्रेसचे शालेय शिक्षणमंत्री स्व. रामकृष्ण मोरे यांचे देहू हे जन्मभूमी, कर्मभूमी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ते शिल्पकार आहेत. त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. कॉंग्रेसमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. सतरा प्रभागासाठी पंधरा जणांनी मुलाखती दिली आहे.

अनेक कार्यकर्ते पक्षाकडे उमेदवारी मागत असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय न करता त्यांना पाठबळ देऊन निवडणुकीचे रिंगण लढविले जाईल, असे पत्रकारांनी यावेळी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना उपस्थितांनी व्यक्‍त केले.

Post a Comment

Previous Post Next Post