ह्युमन राईट्स जस्टिस असोशियन च्या वतीने रक्तदान

 शिबिराचे उद्घाटन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक ऍड. कैलास पानसरे यांनी  केले

                 पुणे जिल्हा जागतिक मानव अधिकार दिना निमित्ताने ह्यूमन राईट्स जस्टीस असोशियन यांच्या वतीने पिंपरी चिंचवड रक्तपेढी यांच्या सौजन्याने देहूरोड मध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न.                       



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

देहूरोड दि. १२ :- पुणे जिल्हा जागतिक मानवाधिकार दिनानिमित्ताने ह्युमन राईट्स असोशियन असोसिएशन यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड रक्तपेढी यांच्या सौजन्याने देहू रोड दत्त मंदिरात आयोजित मानवता उपक्रम रक्तदान शिबिराला देहूरोड मधील मानवतावादी रक्तदाते यांनी रक्तदान करून रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.                        

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक ऍडव्होकेट कैलास पानसरे यांनी फित कापून केले या वेळी ह्युमन राईट्स असोशियन असोशियन च्या वतीने ॶॅड कैलास पानसरे सहीत आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन सन्मान केला.               

    या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष एडवोकेट कृष्णा दाभोळे, कार्याध्यक्ष गणेश कोळी, सेवादल अध्यक्ष रेणु रेड्डी, राष्ट्रवादी कॉंग्रेस दक्षिण विभागाचे देहूरोड अध्यक्ष शिवकुमार मुरगन, राष्ट्रवादी मावळ तालुका महिला अध्यक्षा हेमा रेड्डी, मावळ तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष गफूरभाई शेख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जावेद शिकलकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस देहूरोड शहराध्यक्ष अशिष बंसल, मानव अधिकार संरक्षण चे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी, मानव अधिकार  संरक्षण संघटनेचे शहराध्यक्ष विजय पवार, युवा नेते अमोल नाईकनवरे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा सारिकाताई, नाईकनवरे, देहूरोड शहर दक्षिण युवती अध्यक्षा इंदु मैईकली, धम्म नेते प्रकाश कांबळे, आंबेडकर चळवळीतचे नेते प्रविण दादा गायकवाड, प्रभाकर विक्रम सामाजिक कार्यकर्ते भिमसिंग चलवादी, शंकर तलारी, फोटो ग्राफर असोशियन चे अध्यक्ष बाबु टाकल राष्ट्रवादी युवा नेते धनराज शिंदे, अजय जाधव, शिवसेना नेते रमेश जाधव, शशिकांत सप्पागुरु, आनंद साळवी, युवा नेते फरत आत्तार, भाजप नेते हनिफभाई शेख व त्यांचे महिला कार्यकर्ता उपस्थित होते आदी उपस्थित होते.                  या वेळी रक्ताला जात धर्म वंश नसतो आपण रक्तदान करून एखाद्याचा प्राण वाचवतो ती व्यक्ती कोणत्या धर्म जात पंथाची आहे हे कोणालाही माहीत नसते असा हा मानवतावादी स्तुत्य उपक्रम आहे हा उपक्रम ह्यूमन राइट्स जस्टिस असोसिएशन आयोजन केल्यामुळे आयोजकांना एडवोकेट कैलास पानसरे यांनी धन्यवाद दिले. आपले मनोगत व्यक्त करताना पानसरे यांनी जागतिक मानव दिवस हा १९४८ पासुन अमलात आला संयुक्त राष्ट्रांच्या वतीने २४५ देशानी बैठक घेऊन मानव जातीला मानव अधिकार द्वारे न्याय मिळविण्या साठी सर्व राष्ट्र एकत्रित येऊन मानव अधिकार दिवसची निर्मिती केली व या मानव अधिकार मुळे अनेक लोकांना न्याय मिळु लागले या साठी १० डिसेंबर हे मानव अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो आज पुणे जिल्हा ह्युमन राईट्स जस्टिस असोशियन ने रक्तदान शिबीर आयोजित करून  रक्तदान शिबीर घेऊन महान कार्य केले आहे असे कौतुक केले.                               या वेळी मावळ तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे गफुर्भाई शेख यांनी रक्ताला नाते-गोते धर्म जात नसते मानवतावादी उपक्रम आहे याचे खुमासदार शेरो शायरीत व्यक्त करून उपस्थितांचे लक्ष वेधले, या रक्तदान शिबिरात ह्यूमन जस्टीस असोशियन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष परशुराम दोडमनी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय लोंढे मराठा सेवा संघाचे चंद्रकांत दाभोळे आमिर आतार, राष्ट्रवादी दक्षिण विभागाचे शहराध्यक्ष शिवकुमार मुरगन, अब्दुल गणी खान, असे अनेक रक्त दात्यांनी भरपूर प्रमाणात रक्तदान केले. धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेच्या वतीने धम्म नेते के एच सूर्यवंशी यांनी प्रस्ताविकेत जागतिक मानवधिकार दिनाच्या निमित्ताने  संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांनी रक्तपेढी चे संचालक प्रकाश सोनवणे यांच्याशी चर्चा करून संघटनेच्या बैठकीत रक्तदान शिबिर आयोजनाचा प्रस्ताव ठेवला त्याला एकमताने सर्वान मान्य करून आज मानवतावादी उपक्रम रक्तदान शिबिर होत असल्याचे त्यांनी सांगितले. या भव्य दिव्य रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर जिल्हाध्यक्ष इम्तियाज शेख उपाध्यक्ष अमीर आत्तार, संघटक सचिव दिपक चौगुले, जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे शहजाद मुलानी, साधना सामाजिक संस्थेचे सुनील मस्के व मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे यांनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबीरात पिंपरी चिंचवड रक्त पेढीचे समीर जमादार त्याचे सहकारी शामल गाडेकर,प्रियंका चौकुळकर, मनिषा केदारी, रमेश जाधव, प्रेम राठोड यांनी रक्त संकलनाचे परिश्रम घेतले. 



*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क अन्वरअली 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post