पुण्याच्या डॉ.तुषार निकाळजे यांना तामिळनाडू मध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलेप्रेस मीडिया वृत्तसेवा : 

तामिळनाडू :  ई. एस .एन.पब्लिकेशन्स यांनी डॉ.तुषार निकाळजे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले .डॉ.तुषार निकाळजे यांनी ३० वर्ष कर्मचारी पदावर काम करताना उच्च शिक्षण ,संशोधन पूर्ण केले .त्यांनी राज्यशास्त्र विषयात पीएच.डी .प्राप्त केली .आज पर्यंत त्यांनी दहा पुस्तके लिहून प्रकाशित केली आहे .यातील भारतीय निवडणूक प्रणाली हे पुस्तक राज्यशास्त्र विषयाच्या तीन विद्यापीठांच्या बी .ए .व  एम ए. या अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता मिळाली आहे .डॉ.निकाळजे यांनी एकूण ३४ लेख प्रकाशित केले आहे. तसेच दोन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रांमध्ये प्रबंध सादर केले आहेत. दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ब्रेल भाषेमध्ये पुस्तक प्रकाशित केले आहे .महाराष्ट्र निवडणूक आयोगाने वर्ष २०१९ मध्ये डॉ. निकाळजे यांना निष्णात व्यक्ती म्हणून निवड केली आहे. डॉ .निकाळजे यांना आजपर्यंत तीन राज्य , दोन राष्ट्रीय व एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या सर्वांची दखल घेत ई.एस.एन.पब्लिकेशन्स यांनी डॉ. निकाळजे यांना तामिळनाडू येथे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे

PRESS MEDIA

Chief Editor: Mehabub Sarjekhan

Post a Comment

Previous Post Next Post