मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, धुळेच्या वतीने जागतिक संविधान दिन साजरा..!प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इस्लामपूर : इकबाल पीरज़ादे  :

 भारताचे संविधान अर्थातच भारताची राज्यघटना ही भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा  आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला आणि २६ जानेवारी १९५०र पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. देशाच्या कारभारासंबंधी च्या तरतुदीत एकत्रितपणे व सुसूत्रपणे संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत. संविधान हे देशाच्या राज्यकारभारात संबंधीच्या तरतुदींचा लिखित असा सर्वोच्च असे दस्तऐवज आहे. आज २६ नोव्हेंबर असल्याने आजच्या दिवशी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला होता त्या अनुषंगाने संविधान दिन साजरा करण्यात येतो. 

मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, धुळेया समाजिक संस्थेच्या अध्यक्ष सौ मोनिका शिंपी यानी, मनोगत व्यक्त केलेजागतिक सविधान दिनाचे महत्व सांगितले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले

या वेळी अध्यक्षा सौ. मोनिकाताई शिंपी, श्री. अशोक बाविस्कर, श्री. सुरेश सोनवणे, श्री. भुषण बाविस्कर, श्री. अशोक  चव्हान, प्रेम चव्हान, सौ. निर्मला बाविस्कर, सौ. जोशिला सोनवणे,   सौ. पूजा वाणी, सौ. शितल बाविस्कर, उमा खैरनार, सौ. हर्षदा बाविस्कर, सौ. दिपाली सावळे इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.

PRESS MEDIA

Chief Editor: Mehabub Sarjekhan

Post a Comment

Previous Post Next Post