उल्लेखनीय कामगिरी केल्याने खालापूर पोलिसांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते गौरव.




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील.


 खालापूरचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी खालापूर पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांवर चांगलाच अंकुश ठेवण्यात त्यांना आणि त्यांच्या टीमला यश आल आहे. त्यांच्या चाणाक्ष नजरेतून गुन्हेगार काही काळातच गजाआड होणार असा विश्वास खालापूरातील जनतेला वाटू लागला आहे, त्यातच ऑक्टोबर महिन्यात तीन गंभीर गुन्ह्यांची उकल त्यांनी काही दिवसांच्या आत केली असून त्यामध्ये खून प्रकरणातील गुन्हेगार बारा तासांच्या आता गजाआड केले होते. 

     याच कारणाने रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते खालापूर पोलिसांना सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल विभूते, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर, पोसई. बजरंग राजपूत, मपोसई सरला काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, पोह.नितीन शेडगे, हेमंत कोकाटे, सचिन व्हसकोटी या सर्वांना सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तर पोलीस अधीक्षक अशोक दुधे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते खालापूर पोलिसांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान झाल्याने त्यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post