एकता सांस्कृतिक महोत्सव २०२१-२२ चे आयोजन

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 ३३वा एकता सांस्कृतिक महोत्सव गिरगाव येथील साहित्य संघ नाटयमंदिर येथे आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभाग होण्याचे आवाहन एकताचे अध्यक्ष प्रकाश गणपत जाधव यांनी केले आहे.

 २४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता अभिनय, गायन, काव्यवाचन, एकेरी नृत्य, दुहेरी नृत्य, समूह नृत्य, चित्रकला इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख - 19 डिसेंबर असून समूह नृत्यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, 10000, 7000, 5000 रु. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या कलावंतांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येतील. असे एकताचे सचिव प्रकाश पाटील यांनी एका पत्राद्वारे जाहीर केले आहे.  

अधिक माहितीसाठी संपर्क- मुंबई विभाग- 9220899120/ 8177870586, वैशंपायन- 9820209516

ठाणे विभाग- वृषाली शिंदे- 9969484328, 

डोंबिवली, कल्याण, बदलापूर विभाग-  भाग्यलक्ष्मी पडसळगीकर- 9892503101/ सुष्मा देशपांडे- 9867756711

विरार विभाग- विशाल संगारे- 9764562594

रोहा- आरती धारप - 9637091811

Post a Comment

Previous Post Next Post