अजीवली विद्यामंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारचा उदघाटन सोहळा संपन्नमा.आमदार श्री. मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते संपन्न






प्रेस मीडिया वृत्तपत्र

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी सुनील पाटील

शिवसेना ही नेहमी ८०% समाजकारण व २०% राजकारण करीत असते, याच तत्वाचा आदर करत सोमवार दिनाकं 15 ऑक्टोबर 2021 रोजी जनता विद्यामंदिर, अजीवली येथील मुख्य प्रवेशद्वारचा (गेट) उदघाटन सोहळा  *शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार, श्री. मनोहरशेठ भोईर* यांच्या हस्ते करण्यात आला. 

सामाजिक बांधिलकी जपत पनवेल तालुका प्रमुख रघुनाथशेठ पाटील, परेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गायकर, विष्णू लहाने, सुधीर पाटील, अनंत सुदाम पाटील यांनी स्वखर्चाने मोडकळीस आलेला शाळेचा प्रवेशद्वार नवीन बसवण्यात आला. 

यावेळी  शिवसेना रायगड उपजिल्हा संघटक परेश पाटील, शालेय कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, रायगड विभाग निरीक्षक महाजन सर, प्राध्यापक जाधव सर, शिवसेना उपतालुका प्रमुख जगदीश मते, विष्णू लहाने, उपतालुका संघटक सुधीर पाटील, महेंद्र गायकर, अनंत पाटील, मारुती म्हात्रे, युवासेनेचे प्रणव लबडे, दीपक मुंढे, अतुल पाटील व  मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post