१५०० कुटुंबियांना दिवाळी फराळ सामान वाटप करण्यात आले.

कार्यक्रमचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिला प्रमुख प्रतिनिधी: सुनील पाटील

भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व श्री युवा प्रतिष्ठान तक्का-पनवेलचे प्रमुख मार्गदर्शक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालीश्री युवा प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते प्रतिक देवचंद बहिरा व भारतीय जनता पार्टी तक्का विभागीय कमिटी यांच्या वतीने १५०० कुटुंबियांना दिवाळी फराळ सामान वाटप करण्यात आले. या कार्यक्रमचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

        कोरोना वैश्विक महामारी नंतर  उद्भवलेल्या परिस्थितीत थोडाबहुत आधार देण्याच्या दृष्टीकोनातून दिवाळीच्या सणाला दिवाळी फराळ सामानाचे वाटप करण्यात आले असून या कार्यक्रमास भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेवक तेजस कांडपीले, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, प्रभाग अध्यक्ष रघुनाथ बहिरा, जेष्ठ नेते शंकरशेठ म्हात्रे, सुनिल पगडे, जयंत बहिरा, विशाल म्हसकर, सचिन चिखलेकर, डी.एस घरत, कुणाल म्हात्रे, बबन कांबळे, अण्णा भगत, श्री. नाईक, तसेच भाजपाचे पदाधिकारी व श्री युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post