पेट्रोल आणि डीझेलचे दर महाराष्ट्रात तरी ५० ते ६० रुपये लिटरच्या वर जाता कामा नये.. ..संभाजी ब्रिगेड


जनतेला लुटण्याचे काम नरेंद्र मोदी सरकार करत आहे.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे : पेट्रोल आणि डीझेल चे दर महाराष्ट्रात तरी ५० ते म्हणाले६० रुपये लिटरच्या वर जाता कामा नये अशा पद्धतीने कारभार करा अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.या संदर्भात शिंदे म्हणाले कि ,' स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडेल इतकी इंदर दरवाढ झाली. आज पेट्रोल 115 रुपये लिटर तर डिझेल 110 रुपये लिटर झाले. घरगुती गॅस दरवाढ सुद्धा 950 रुपये पर्यंत गेला आहे. महाराष्ट्रा सह भारतीय जनतेला लुटण्याचे काम नरेंद्र मोदी सरकार करत आहे. गगणाला भिडणारी ही इंधन दरवाढ मोदी सरकारचे पाप आहे.

पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल दहा रुपये दर कमी करणे म्हणजे लोकांची जखम कुर्तडणे आणि जखमेवर'ची खपली काढण्याचा प्रकार आहे.80 रुपये पेट्रोल डिझेल दरवाढ झाली म्हणून बोंबलणाऱ्या स्मृती इराणी, हेमा मालिनी, राजनाथ सिंग व नरेंद्र मोदी सध्या कुठेच दिसत नाहीत. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमला हा देश लुटायचा आहे. सर्व शासकीय कंपन्या अदानी अंबानीला विकून या देशात बलाढ्य यंत्रणांच खाजगीकरण करायचं आहे. देशभक्तीचे गाजर दाखवून व 'अच्छे दिना'च्या काळ्या रांगोळ्या काढून हा देश रसातळाला गेला. हे संघी वास्तव आहे. थोडी तरी अर्थतज्ञांकडून अक्कल विकत घेऊन तात्काळ इंधन दरवाढ 50 टक्केच्या वर कमी केली पाहिजे. म्हणून पेट्रोल डिझेलचे दर 50 रुपये लिटर पर्यंत दर कमी केले पाहिजे.

या देशात जीएसटी (GST) चे नवीन कर प्रणाली नरेंद्र मोदी सरकारने आणली. त्याला इंधन अपवाद ठेवले. पेट्रोल, डिझेल, गॅस हे सर्व जीएसटी च्या कक्षात आणावे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. यासाठी नरेंद्र मोदींनी 56 इंचाच्या छाती चा वापर करावा. अशी तमाम भारतीयांच्या वतीने अपेक्षा आहे. पेट्रोल डिझेल जीएसटी कक्षात घेतली तर नक्कीच इंधन दरवाढ कमी होईल आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा होईल आणि राज यांना तसे अधिकार द्यावेत.केंद्र सरकार अत्यंत करंटे असून कपटी, सूडबुद्धीने वागणारे व अत्यंत नालायक सरकार म्हणून याची इतिहासात नोंद होईल.

Post a Comment

Previous Post Next Post