देहूरोड पोलिस ठाण्यात सर्व मस्जिदचे विश्वस्त व मदद फाउंडेशन यांची मिटिंग संपन्न

 मदद फाउंडेशन या संघटनेचे  सामाजिक कार्याबद्दल कौतुक 
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

देहूरोड :  काल देहूरोड पोलिस ठाण्यात मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्यामधे देहूरोड मधील मशिदीच्या विश्वस्त व मशिदीमधे नमाज पठण करणारे मौलवी व मदद फाउंडेशन देहूरोड या सोशल काम करणाऱ्या संघटनेला ही प्रामुख्याने निमंत्रित करण्यात आले होते.

  सभेच्या सुरवातीस मदद फाउंडेशन देहूरोडच्या वतीने रावसाहेब जाधव मुख्य पोलिस निरीक्षक देहूरोड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र निकाळजे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

  त्रिपुरा येथे घडलेल्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी जे मोर्चे निघाले त्यामध्ये  महाराष्ट्रात ही पडतीसात उमटले  वातावरण तापले होते पोलिस प्रशासनाच्या तत्परते मुळे वातावरण शांत व नियंत्रणात आहे , देहूरोड शहरात कुठल्याही प्रकारे अनुचुत घटना घडू नाही याची काळजी घेणे आपल्या सगळया लोकांची मानवतेच्या दृष्टीकोनातून गरज आहे, असे देहूरोड पोलिस मुख्य निरीक्षक रावसाहेब जाधव यांनी आव्हान केले आहे तसेच मदद फाउंडेशन देहूरोड या  संघटनेचे त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक  करण्यात आले.


 व गुन्हे शाखेचे मुख्य निरीक्षक,राजेंद्र निकाळजे साहेब  त्यावेळी म्हणाले की बाहेरील कोणी वेक्ती देहूरोड शेहरात जर अफ़वा पसरवत असेल तर त्याची माहिती तुम्ही पोलिसांना द्या,व सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या अफवांवर विश्वास ठेवून त्याला प्रतिसाथ देऊ नका, माणुसकी, भाई चारा प्रेम जपा,आम्ही तुमच्या समस्याचे निवारण करण्यासाठी आम्ही सतत आपल्या सोबत आहोत.

या वेळी देहूरोड शहरातील सर्व मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित वेक्ती,सर्व मशिदीचे मौलवी (धर्म गुरू ) व सर्व जाती धर्माच्या मदतीसाठी धावून जाणारी मदद फाउंडेशन देहूरोड चे सर्व कौर कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post