भारतीय संविधान हे आपलं मूलभुत हक्क व अधिकार

 या महा रॅलीत सर्व क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी  सहभागी होण्याचे आवाहन.                


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

 भारतीय नागरिक देहूरोड शहर च्या वतीने येत्या २६ नोव्हेंबरला देहूरोड शहरातुन भारतीय संविधान महा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे .                     

देहूरोड शहरातील विविध संस्था, संघटना ,पक्ष प्रमुखानी बैठकीत उस्फुर्त एकत्रीत येऊन येत्या २६ नोव्हेंबरला भारतीय संविधान दिना  निमित्त देहूरोड शहरातुन भारतीय संविधान महा रॅलीचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. देहूरोड शितळा नगर मधील धम्मसदन बुद्ध विहारात राजाराम अस्वरे (दादा) यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत देहूरोड शहरातील मान्यवर नेते,पक्ष, सामाजिक संघटना,कला,क्रिडा असे सर्व विविध क्षेत्रातील  प्रमूखांनी एकत्रित सहभागी होऊन कोणत्याही पक्ष,संघटना, संस्था यांच्या वतीने आयोजन न करता आपण एक भारतीय नागरिक म्हणून सर्वानी एकत्रित होऊन भारतीय नागरिक देहूरोड शहर यांच्या वतीने  येत्या २६ नोव्हेंबर २०२१ संविधान दिनी  धम्मभूमी देहूरोड शहरातुन   भारतीय संविधान महा रॅली चे आयोजन करण्याचे एकमुखी ठरविण्यात आले.

 २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनी भारतीय संविधान रॅली सकाळी ठिक १०.०० वा. विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक प्रवेशद्वार शिल्पा पासुन प्रारंभ करून मुंबई पुणे महामार्गने सवाना हाॅटेल बँक आॕफ इंडिया चौक, अभिविला चौक, एम बी कँप मार्गे, वृदांवन हाॕटेल, म.ज्योतिबा फुले मंडई चौक, ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, गुरुद्वारा मार्गे देहूरोड कॕन्टो.बोर्ड रूग्णालयातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन होईल. तेथुन पुन्हा प्रवेशद्वार येथे संविधान उद्देशिकेचे वाचन करुन   भारतीय संविधान महारॅलीची सांगता करण्याचे ठरविले आहे.                     

या भारतीय संविधान महा रॅलीत  प्रमुख उपस्थीती मध्ये पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे  पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष  ब्रिगेडियर अमन कटोज, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल  प्रमुख अतिथी आदी मान्यवर या महा रॅलीत सहभागी होणार आहेत. वरील मान्यवर  उपस्थित देहूरोड नागरिकरांना संविधान  संरक्षण प्रतिज्ञा देणार आहेत तसेच या महा रॅलीत देहूरोड च्या सर्व शाळेतील  विद्यार्थी, व शिक्षकगंण ही सहभागी होणार आहेत.  तरी  आयोजित  भारतीय संविधान या महा रॅलीत देहूरोड परिसरातील सर्व भारतीय नागरिक बांधवांनी सहभागी व्हावे असे  देहूरोड शहर भारतीय नागरिक याच्या वतीने करण्यात आले आहे.                             



*जाहिरात व बातम्यांसाठी अन्वरअली संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post