| येरवडा कारागृहात आमदाराने चक्क कैद्याचा हाताचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली

आमदाराने एवढ्या जोरात चावा घेतला की त्या कैद्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवावे लागले 

 :

प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख

पुणे  :  येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आमदाराने चक्क दुसऱ्या कैद्याचा हाताचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आमदाराने एवढ्या जोरात चावा घेतला की त्या कैद्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवावे लागले आहे.चावा घेतलेला कैदी हा एक मोठा बांधकाम व्यावसायिक आहे. आमदार आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाले आहेत.

एका आठवड्यापूर्वी दोघांनाही कारागृहात फिरण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी कारागृहात असतानाही बांधकाम व्यावसायिक बिनधास्त फिरताना दिसतात. त्यांच्यावर काहीही परिणाम होत नसल्याचा राग या आमदाराला आला. त्याच रागात आमदाराने बांधकाम व्यावसायिकाच्या हाताचा जोरदार चावा घेतला. त्यामुळे ताबडतोब या बांधकाम व्यावसायिकाला ससून रुग्णालयात दाखल करावे लागले.

चावा घेतलेले हे आमदार आणि बांधकाम व्यावसायिक हे दोघेही चांगलेच प्रसिद्ध आहेत. मात्र सध्या ते कारागृहात शिक्षा भोगत आहेत. अनेक ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार कारागृहात शिक्षा भोगत आहेत. तर बांधकाम व्यावसायिकही ठेवीदारांच्या फसवणुकीप्रकरणीच कारागृहात आहे. या आमदाराने बांधकाम व्यावसायिकाच्या हाताचा खुप जोरात चावा घेतल्याने कारागृह प्रशासन चिंतेत होतं. मात्र लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

यापूर्वीही एकदा या बांधकाम व्यावसायिकाने आमदार आपल्याला चावल्याची तक्रार केली होती. त्यावेळी त्याने थेट मंत्र्याकडेच तक्रार केली होती. मात्र पुन्हा एकदा या आमदाराने तसाच प्रकार केल्याने कारागृहाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना 10 ते 15 दिवसांपूर्वी घडली होती. बांधकाम व्यावसायिकाला लगेच रुग्णालयात दाखल केल्यामुळे सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.

Post a Comment

Previous Post Next Post