पिंपरी-चिंचवड महापालिका २० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देणार आहे.

देहूरोड ऐतिहासिक धम्मभूमी बुद्ध विहाराच्या सामाजिक कार्यक्रमासाठी


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमी बुद्ध विहाराच्या सामाजिक कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका २० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देणार आहे.

धम्मभूमीवर गेली ६० वर्ष सांस्कृतीक व सामाजिक वारसा जपण्याचे कार्यक्रम होतात. या ठिकाणी भारत देशातून लाखो अनुयायी जमा होतात. या ऐतिहासिक भूमीला सुद्धा सामाजिक कार्यक्रमास आळंदी, देहू या तिर्थक्षेत्राप्रमाणेच महापालिकेकडून कायमस्वरुपी आर्थिक मदत मिळावी. पिंपरी-चिंचवड शहरामधून या ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी अभिवादनास जातात. याठिकाणी होणा-या सामाजिक कार्यक्रमास या आर्थिक वर्षात २० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ऐतिहासिक धार्मिक स्थळ महापालिका हद्दीबाहेर असल्याने महापालिका धोरणानुसार देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड यांच्या नावे अदा करण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या उपसूचनेला महासभेने मान्यता दिली.



भारत देशाच्या वैभवशाली परंपरेचा सांस्कृतिक व महानतत्वज्ञानाचा वारसा २५ डिसेंबर १९५४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देहूरोड येथे रुजविला. याठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांचे बुद्धरुप स्थापन करुन हजारो वर्षांची पंरपरा या भूमीला दिली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला ऐतिसाहिक वारसा लाभलेला आहे. ।

Post a Comment

Previous Post Next Post