झाडांची होणारी अवैध कत्तल थांबविण्यासाठी पर्यावरण प्रेमींच्या वतीने झाडांना श्रद्धांजली म्हणून अनोखे ‘वृक्ष श्राद्ध’ आंदोलन



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अन्वरअली शेख :

पिंपरी चिंचवड शहरात झाडांची होणारी अवैध कत्तल थांबविण्यासाठी पर्यावरण प्रेमींच्या वतीने झाडांना श्रद्धांजली म्हणून अनोखे ‘वृक्ष श्राद्ध’ आंदोलन करण्यात आले. पीसीएनटीडीए सर्कल, इंद्रायणीनगर येथे रविवारी दि.१४ , सांकेतिक पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

वृक्षमित्र, निसर्ग राजा मित्र जीवाचे, अविरत श्रमदान, सह्याद्री देवराई आणि पर्यावरण प्रेमी आदींच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी वृक्षतोडीत मृत झालेल्या झाडांचे प्रतिकात्मक फोटो पर्यावरण झेंड्यावरती लावून त्यांना हार अर्पण करण्यात आले. मृत झाडांना मुक्ती मिळावी यासाठी त्यांचे पिंड पाडून पर्यावरण प्रशासनाला जागे करण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले.

‘शहरातील वाढलेली अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. शहरातील अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी आणि प्रशासनात वृक्षांबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी तसेच, नागरिकांमध्ये देखील जनजागृती निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.

वृक्षांबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी पुढे येण्याची गरज आहे,शरतेक झाड तोडण्याच्या अधी दहा झाडे लावा व वाचवा हा उपक्रम राबविण्यात आला पाहिजे,शहरातील तोडलेल्या झाडांचे वृक्षश्राद्ध घालून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत सांकेतिक कार्यक्रम करण्यात आला,

Post a Comment

Previous Post Next Post