राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला असल्याचं समोर

जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदार  खळबळ ...


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

परभणी :  महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजवून देणाऱ्या अनेक घटना घडत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यातच मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला असल्याचं समोर आल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ माजली आहे.

परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पाथरी मतदारसंघाचे आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कळवलं आहे. तसेच अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे जिल्हाभरात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार बाबाजानी दुर्राणी यांना काही दिवसांपुर्वी एका इसमाने मारहाण केली होती. त्यानंतर या घटनेचा निषेध म्हणून बाबाजानी दुर्राणी यांच्या समर्थकांनी पाथरीसह संपुर्ण जिल्ह्यात बंद पुकारला होता. त्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांच्यासह समर्थकांकडून आरोपी मोहम्मद बिन सईद याला हद्दपार करण्यात यावं, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती.

घटनेलाए एक आठवडा उलटल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने बाबाजानी हे नाराज होते. त्यातच आज त्यांनी जयंत पाटील यांनी फोनवरून आपल्या राजीनाम्याबद्दल सांगितलं आहे. तर आता राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. तसेच त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झाला नसून पक्षश्रेष्ठी यात काही मार्ग काढणार का?, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post