भीमराव नायकल यांनी शाळा हेच जीवन मानले.

 नामदेव पाटील  मुख्याध्यापक कै.भिमराव नायकल   पुण्यस्मरणदिन साजरा


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इस्लामपूर  : इकबाल पीरज़ादे

शाळा हेच जीवन या एकमार्गी जीवन शैलीचा  मुख्याध्यापक कै.भिमराव नायकल यांनी सुरुल आणि परिसराला आदर्श घालून दिला,अनेक संकटावर संयमाने मात करण्याचे त्यांचे कौशल्य होेते असे प्रतिपादन सुरुल गावचे माजी सरपंच व यशवंत दूध संघाचे अध्यक्ष नामदेवबापू पाटील यांनी केले.ते श्री.माणकेश्वर विद्यालय ,सुरुल ता.वाळवा येथे कै.भिमराव विष्णू नायकल यांच्या पाचव्या पुण्य स्मरण दिनानिमीत्त बोलत होते.या निमीत्ताने विद्यार्थ्यांना टूथपेस्ट,ब्रश तसेच खाउ वाटप करण्यात आले.यावेळी माजी सरपंच जगन्नाथ नांगरे,मुख्याध्यापक एस.डी.सुतार यांची उपस्थिती होती.पाटील म्हणाले,नायकल सरांनी शाळा आणि संस्था प्रशासन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला,गावांतील मुलींंच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यात त्यांचे अविस्मरणीय कार्य आहे.शेकडो विद्यार्थी घडले या पाठिमागे त्यांची प्रामाणिक शिक्षण सेवा होती.जगन्नाथ पाटील म्हणाले,ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रसंगी घरोघरी जावून पालकांची समजूत घालणारे नायकल सरांचे व्यक्तीमत्व होते.त्यांचे या गावातील शिक्षणात योगदान आहेच तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता.मुख्याध्यापक एस.डी.सुतार म्हणाले,नायकल परिवाराने शाळेचे ऋणानुबंध कायम राखले आहेत.विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सामाजिक उपक्रम राबवला,यापूर्वीही शाळेच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.यावेळी सुखदेव पाटील,संजय शेवाळे,पुरुषोत्तम मोहिते,सीताराम भौदुले,गुलजार अत्तार,शैलजा पाटील,सुरेशा जोशी,राहुल पाटील,स्वप्नाली पाटील आदीसह ग्रामस्थ,माजी विद्यार्थी उपस्थित होते.कुमार आडके यांनी स्वागत केले.पी.पी.मोहिते यांनी आभार मानले.

*फोटो ओळी:-माणकेश्वर विद्यालय सुरुल येथे विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करताना नामदेव पाटील, बंडोपंत नांगरे, एस. डी सुतार, पी.पी मोहिते व अन्य*

Post a Comment

Previous Post Next Post