पणजी गोवा येथे समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणा-यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.








प्रेस मीडिया वृत्तसेवा : पणजी गोवा :

    ज्ञानज्योती सामाजिक सेवाभावी संस्था, सोलापूर या संस्थेच्या वतीने समाजामध्ये  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी जनांना पुरस्कार देऊन  सन्मानपूर्वक गौरव करन्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक डॉ. विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

   त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष   म्हणून डॉ. सुमित्रा भोसले, नंदिनी गारमेट्स च्या संस्थापिका, यशस्वी उद्योजिका या होत्या. तसेच सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, चेअरमन, पुने  डॉ.संजय बी चोरडिया, सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनचे  वाईस चेअरमन,पुने  सुषमा चोरडिया, चिकोडी हॉस्टेल अधिकारी  जीवन पम्मार, अॅड सुदर्शन तमन्नवर, एॅड निरंजन कांबळे, धोंडीबा कुंभार, सामाजिक कार्यकर्ते इचलकरंजी, डॉ.रावसाहेब सिद, अनवर मुल्ला.पत्रकार, विमल हट्टीमणी आदि मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय फिनीक्स प्रेरणा गौरव  पुरस्काराने त्यांना शाल, श्रीफळ, फेटा, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. समाज भुषण, समाजरत्न, समाज गौरव, कला भुषण,कलारत्न, क्रिडा भुषण गौरव पुरस्कार असे एकुण कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तिन्ही राज्यातुन 53 गुणी जनांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वागत भाषण कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक डॉ विक्रम शिंगाडे यांनी केले. तर प्रास्ताविक धोंडीबा कुंभार यांनी केले.

   डॉ.सुमित्रा भोसले यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणाला की प्रत्येकाने आपले जीवन आनंदमयी जगले पाहिजे. आपला स्वार्थ मागे ठेवून समाजासाठी कार्य करीत राहीले पाहिजे. तसेच डॉ. विक्रम शिंगाडे यांचे कार्य प्रत्येकाने प्रेरणा घेन्यासारखे आहे. प्रत्येक समाजातील घटकाला अनेक प्रकारचे सेवा करत असनार्यांचे दखल घेऊन त्यांना प्रेरणा देण्याचे कार्य डॉ. विक्रम शिंगाडे सतत करत असतात. त्यांचे कौतुक करेल तितकेच कमी आहे. कारण दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवुन समाजाला प्रेरणा देत असतात. असे त्या म्हणाल्या. 

 तसेच सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, चेअरमन डॉ संजय चोरडीया म्हणाले की समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहित व प्रेरणा देण्याचे कार्य सतत करत असतात. फक्त. पुरस्कार वितरण कार्यक्रम नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रम ते नेहमी राबवत असतात. मी सहा वर्षांपासून त्यांच्या कार्याची वाटचाल पाहत आहे. त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे. आणि मी नेहमी डॉ. विक्रम शिंगाडे सरांच्या पाठीशी आहे. अशी त्यांनी  ग्वाही दिली.

  तसेच यशस्वी उद्योजक दत्तात्रय पाटील म्हणाले की विक्रम शिंगाडे यांचे कार्य प्रेरणा घेन्यासारखे आहेच. त्यांच्या कार्याचा आम्ही कौतुक करतो. असे कार्य प्रत्येक गावा-गावा मध्ये करावे.व प्रत्येक गावात एक विक्रम तयार व्हावा असे ते म्हणाले. 

   त्यावेळी कार्यक्रमाचे संयोजक  नेताजी गोरे, अरुण कांबळे, योगेश निकम तसेच कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यातिल पुरस्कारकर्ते उपस्थित होते. हा कार्यक्रम दि- 21 रोजी पणजी- गोवा येथे ग्लारा - ईनफेरियण आवाके हॉल येथे हा कार्यक्रम खुप आनंदी - उत्साही वातावरणामध्ये पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post