डॉ विनोद गिते कोरोना योद्धा व आरोग्यदुत पुरस्काराने सन्मानित

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :

 सुनील पाटील : 

विनोद गिते यांना कोरोना योद्धा व आरोग्य दुत पुरस्काराने पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवतरुण मित्र मंडळ यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल डॉ विनोद गिते यांचे अभिनंदन केले जात आहे.

          नवतरुण मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव निमित्त  पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचे स्वागत करताना मंडळाचे कार्याध्यक्ष व भाजप युवा मोर्चा अध्यक्ष जितेंद्र काटकर आणि मंडळाचे अध्यक्ष प्रताप चव्हाण व मंडळाचे खजिनदार राजेश पाटील, राजु सावंत, सुभाष गावडे, आनंद सोनवणे, अजित लुबाळ, पकंज सोलनकर, तानाजी लोखंडे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वैश्विक कोरोना संकटात नावडे शहरात मानवतावादी दृष्टिकोन ठेवून कोरोना बाधित आणि अन्य रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांवर उपचार करणारे नावडे शहरातील डॉ विनोद गिते यांना कोरोना योद्धा व आरोग्य दुत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post