टाकेदेवी येथील नवरात्रोत्सवात मोफत चहापाणी व्यवस्था; आमदार महेश बालदी यांचे भाविकांनी मानले आभार



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रतिनिधी  : सुनील पाटील :

 नुकताच संपन्न झालेल्या नवरात्री उत्सवात दांड फाटा येथील टाकेदेवी देवीचे २० हजारहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. आणि या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या सौजन्याने मोफत चहा पाण्याची सुविधा देण्यात आली. 

        दांड फाटा येथील टाकेदेवी जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भाविकांची मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे दूरवरून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी येथे नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यामुळे दमदार आमदार म्हणून प्रसिद्ध असेलेले आमदार महेश बालदी यांनी नवरात्रौत्सवानिमित्त दांडफाटा येथे टाकेदेवी मातेच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना मोफत चहा पाण्याची सेवा उपलब्ध करून दिली होती. त्या अनुषंगाने १७ हजार ८०० चहा व २३ हजार पाणी ग्लासचे वाटप या ठिकाणी झाले आणि त्याचा भाविकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. त्यामुळे भाविकांनी आमदार महेश बालदी यांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post