पुणे शहरा मध्ये गेल्या 24 तासात 55 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 86 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे: शहरा मध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून शंभर च्या खाली आज रुग्ण सापडले आहेत.पुणे शहरा मध्ये गेल्या 24 तासात 55 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 86 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 38हजार 859इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 93हजार 925इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 7रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 4पुणे महापालिका हद्दीबाहेरील 3रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9073जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 862रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 143रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 3533 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post