पुण्यातील रस्त्यांचे नारायण राणे खड्डा, देवेंद्र फडणवीस खड्डा, चंद्रकांत पाटील खड्डा असे नामकरण ,


पुणेकरांची खड्ड्यातून सुटका करावी. नाहीतर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करू ...शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे : खड्डे बुजवा, दणके वाचवा' अशा घोषणा देत शिवसेनेने पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार आंदोलन केले. अभिनव चौक ते टिळक रोडवरील न्यू इंग्लीश स्कूलपर्यंत बैलगाडी चालवत खड्डा मणका आंदोलनही करण्यात आले.पुण्यातील रस्त्यांचे नारायण राणे खड्डा, देवेंद्र फडणवीस खड्डा, चंद्रकांत पाटील खड्डा असे नामकरणही यावेळी करण्यात आले होते.

नागरिकांना अनेक आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपला रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करता आली नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. या आंदोलनाची सत्ताधारी पक्षाने दखल घेऊन पुणेकरांची खड्ड्यातून सुटका करावी. नाहीतर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post