अपघात वृत्त : पुण्यातील नऱ्हेगावातील सेल्फी पॉईंटजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात , अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर 13 जण गंभीर जखमी .

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे : मुंबई-बंगळुरु महामार्गावर पुण्यातील नऱ्हेगावातील सेल्फी पॉईंटजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत.इथेनॉल वाहून नेणाऱ्या टँकरने टेम्पो ट्रँव्हलरला जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

अपघात ग्रस्त गाडी थेट महामार्गावरील पुलावरुन उडून खाली सर्विस रोडवर येऊन पडली होती. एवढा हा भीषण हा अपघात होता. गुरुवारीही इथे अपघात झाला होता. या रस्त्यावर आज वर 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

या ब्लँक स्पॉटवर आजवर पन्नासच्यावर बळी गेलेत. तरी ही हायवे अँथॉरिटी अधिकारी या तीव्र उतारावर स्पीड ब्रेकर बसवत नाहीत. त्या मुळेच इथे वारंवार अपघात होत असल्याचे पोलिसांचं आणि स्थानिकांचं म्हणणं आहे.

नवले पुलावर विचित्र अपघात

गुरुवारी (21 ऑक्टोबर) मुंबई-बंगळुरु महामार्गावर नऱ्हे गावाच्या हद्दीत भूमकर पूल ते नवले पुलादरम्यान संध्याकाळी पाचच्या सुमारास पिकअप टेम्पोला कंटेनरने धडक देऊन पिकअप टेम्पोने शेजरुन जाणाऱ्या दोन बुलेट, अॅक्टिवा गाड्यांना पाठीमागू धडक देऊन पलटी झाला. या अपघातात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या महिलेचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच चार जण जखमी झाले आहेत.

तर कात्रज नवीन बोगद्यकडून आलेला एक कंटेनर पुढे चाललेल्या पिकअप टेम्पोला धडक देऊन या अपघातामुळे संपुर्ण महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पिकअप टेम्पोमध्ये बांधकाम व्यवसायात वापरण्यात येणारे साहित्य होते .साहित्य संपूर्ण रस्त्यावर अस्तव्यस्त तर पुढे वाहतूक कोंडी झाली असता बघ्याची मोठी गर्दी झाली होती .

साताऱ्याच्या दिशेकडून मुंबई दिशेकडे निघालेल्या एका कंटेनरने पिकअप वाहनाला धडक दिली. त्यामुळे पिकअप वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन दुचाकींना त्याची धडक बसली. कंटेनरन पिकअपला धडक दिल्यानंतर न थांबता पुढील दोन-तीन वाहनांना धडकला.

Post a Comment

Previous Post Next Post