राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीने पुण्यात व राज्यात मोदी सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात गॅस सिलिंडर श्राद्ध आंदोलन केले



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 पुणे : गेल्या दोन वर्षांपासून मोदी सरकारने गॅस,पेट्रोल, डिझेल चे दर वाढवले आहेत. 2 दिवसांपूर्वीच मोदी सरकारने गॅसदरवाढ तब्बल 15 रूपयांनी वाढवली.

आतापर्यंत आंदोलन करून सुद्धा मोदी सरकार गॅस दरवाढ कमी करेना, या मुद्यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीने पुण्यात व राज्यात आज मोदी सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात गॅस सिलिंडर श्राद्ध घालत आज अनोखे आंदोलन केले. आंदोलनाच्या वेळी मोदी सरकारने वाढवलेल्या महागाईचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीकडून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यश रुपाली चाकणकर यांनी केले. तर, हे आंदोलन पुण्यात अलका टॉकीज चौक येथे करण्यात आले.

या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा मुणाल वाणी, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, अनिता पवार, ज्योती सुयवशी, प्राजक्ता जाधव,रत्ना नाईक,मंगल ताई,सविता मारणे, सोनाली उजागरेव राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

दरम्यान, रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'गेल्या दोन महिन्यापासून गॅसचे दर भरपूर वाढवले आहेत. या गॅसच्या सबसिडी मधून केंद्र सरकारला पैसे मिळत आहेत. सर्वसामान्य नागरिकांचा केंद्र सरकारने अंत पाहिला आहे. दोन महिन्यापूर्वी 5,10 रुपयाने गॅस वाढत होता, पण तो दोन दिवसापूर्वी 15 रुपयांनी वाढला यातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला पार्टी अख्या राज्यभरात
गॅस सिलिंडर श्राद्ध घालत आंदोलन करत आहोत.'

Post a Comment

Previous Post Next Post