अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल मध्ये उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या शाळा सुरू करण्याच्या आदेशाला प्रतिसाद देत आज महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल मध्ये मोठ्या उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. 

 या वेळी प्राचार्या परवीन झेड. शेख , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत  केले. मधुर गाण्यांच्या सुरांनी वातावरणात उत्साह संचारला होता. अहद शेख या विद्यार्थ्याने डोरेमॉनचे रुप धारण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. प्राचार्या परवीन झेड शेख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हटले की, कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून दररोज शाळा भरविण्यात येईल, यामुळे विद्यार्थ्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता शाळेत यावे. एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार  विद्यार्थ्यांचे स्वागत व प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. स्वागत भाषणामध्ये डॉ. इनामदार यांनी सर्वांना विशेष मार्गदर्शन केले व कोरोना विषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले.




Post a Comment

Previous Post Next Post