पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क घरगुती एलपीजी सिलेंडर ची अंत्ययात्रा काढत महागाई व दरवादीचा विरोध केला


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे दि ६, केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात आज पासलकर गॅस एजन्सी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले .

महागाई हल्ली रोज वाढतच आहे,सामान्य माणसा पुढे  जगायचं प्रश्न उपस्थित झाल आहे, कोरोना काळात रोजगार कमी झाले आहे आणि त्यात  जीवघेणारी महागाईचा मार,पोट भरण्यासाठी वन वन करणारी सामान्य जनता,

पेट्रोल , डिझेल व घरगुती एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतीने जनता हैराण झाली आहे . मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा ७२ रुपये लिटर पेट्रोल मिळत होते ; परंतु तेच पेट्रोल आज १०८ रुपये झाले आहे असे असताना पुन्हा घरगुती एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे . आता घरगूती गॅस ला तब्बल १००० रुपये पेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात .

Post a Comment

Previous Post Next Post