क्राईम न्यूज : आठ लाख रुपयांचीलाच घेताना रंगेहात पकडले

 ८ लाख रुपयांची लाच मागितली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपआयुक्त  यांना  लाच घेताना रंगेहात पकडले.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :    अनवरअली शेख :

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यरात्री पुण्यात मोठी कारवाई केली ,नितीन ढगे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उपआयुक्त  तसेच ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य देखील आहेत.  यातील तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी त्यांनी जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक नितीन ढगे यांनी त्यांच्याकडे ८ लाख रुपयांची लाच मागितली.याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. 

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपआयुक्त नितीन ढगे यांना १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.नितीन चंद्रकांत ढगे वय ४० असे पकडण्यात आलेल्या उपआयुक्त यांचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



*जाहीरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post