पिंपरी मध्ये एका कंपनीत लागली मोठी आग ,

 आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड  : गांधीनगर, पिंपरी येथील डॉ. बेक कंपनीच्या एका युनिटला मोठी आग लागली आहे. या युनिट मध्ये ऑईलचे मटेरियल असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आज शनिवारी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घटली आली.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल झाले असून महापालिकेच्या  चार गाड्या घटनास्थळी उपस्थित झाल्या आहेत. तसेच  आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, आग कशामुळे लागली, आत कुणी आहे का ? नुकसान किती झाले आहे ?या बाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post