डायलेसिस सेंटर सुरू होणार... विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल  : सुनील पाटील:

पनवेल शहरातील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय डायलेसिस सेंटर करिता तज्ज्ञांची निवड करून सेंटर सुरू करण्याची मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी राज्यमंत्री अदिती तटकरे    यांच्याकडे केली होती .त्यानुसार लवकर येथील डायलिसिस सेंटर सुरू होणार आहे याचा लाभ शेकडो नागरिकांना होणार आहे.

          जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील डायलेसिस टेक्निशियन साक्षी संजय राजीवले यांची प्रतिनियुक्ती रद्द करून पनवेल येथे हजर होणे बाबत कळविण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय अलिबाग रायगडचे जिल्हा शल्य चिकिस्तक डॉक्टर सुहास माने यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

           पनवेल शहरातील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यास काही महिन्यापासून लागणारी उपकरणे देखील येथे बसविण्यात आलेली आहेत परंतु तज्ञांची निवड करण्यात आले नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे रायगड जिल्ह्यातून येथे उपचार घेण्यासाठी अनेक रुग्ण येत असतात.

           किडनी आणि मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे खर्चीक असल्याने जिल्ह्यातील रुग्ण दगावण्याची संख्यादेखील वाढत आहे त्यामुळे तातडीने संबंधित विभागास आदेश देऊन नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात तज्ञांची निवड करून सेंटर सुरू करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे नगरसेविका प्रीती जॉर्ज डॉक्टर सुरेखा मोहकर सारीका भगत यांनी अदिती तटकरे यांच्याकडे केली होती त्यांच्या या मागणीला यश आले आहे.

          त्यानुसार पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथील डायलेसिस टेक्निशियन साक्षी संजय राजीवले यांची प्रतिनियुक्ती रद्द करून पनवेल येथे हजर राहण्याबाबत कळविण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय अलिबाग रायगड चे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी कळवले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post