खालापूर तहसील कार्यालय यांना खालापूर तालुका तलाठी संघाकडून निवेदन.


मुको आया बोल दिया प्रकरणी

 रामदास जगताप राज्य समन्वयक यांची तत्काळ बदली करण्याची जोरदार मागणी ..

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील पाटील : 

राज्यातील तलाठी पटवारी मंडलाधिकारी. हे महसूल प्रशासन अधिक लोकाभी मुक्त कार्यक्षम गतिमान व पारदर्शक काम करणे ,तसेच महसूल उत्पन्नात वाढ करणे , राज्यात योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत असताना महसुली लेखा जोखे संगणक करणे सातबारा हो मंडल अधिकारी यांनी स्वखर्चाने रात्रंदिवस काम करून महत्वकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेला असून तथापि महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडलाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष श्री डुबल आप्पा याने सध्या राज्यातील नैसर्गिक आपत्ती ई पीक पाहणी आणि मोफत सातबारा व 8 .अ ,खातेदारांना वितरण  या संदर्भात मंगळवार दिनांक .5 .10 .2021 रोजी. तलाठी पटवारी मंडलाधिकारी यांना मार्गदर्शनपर कार्यकारणी या व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज पाठवला होता तो अन्य ग्रुप द्वारे श्री. रामदास जगताप यांना मिळाला. त्यावर त्याने व्हाट्सअप ग्रुप वर मूर्खासारखे मेसेज पाठवू नका .असं लिहून श्री डुबल आप्पा यांना मूर्ख ठरवले .

पर्यायाने राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी :तलाठी संवग रातील अव्वल कारकून नायब तहसीलदार यांचा अपमान केलेला असून तो अत्यंत  तीव्र स्वरूपाच्या असून श्री रामदास जगताप राज्य समन्वयक यांची तत्काळ बदली करावी .शासनाने  तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या भावनांचा गांभीर्याने विचार करून जगताप यांची अन्यत्र बदली करावी. अन्यथा महाराष्ट्र राज्य तलाठी संघ नाईलाजास्तव आंदोलन सुरू करणार असून आंदोलनाची रूपरेषा 13 ऑक्टोंबर 2021 पासून सर्व कामावर बहिष्कार टाकणार .आंदोलन कालावधी मध्ये नैसर्गिक आपत्ती पण निवडणूक आयोगाचे काम आदेशाप्रमाणे करतील. तरी या बाबत गांभीर्याने विचार करून विना विलंब श्री.रामदास जगताप यांची अन्यत्र बदली करावी. असा जोरदार इशारा खालापूर तालुका तलाठी यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post