उरण शहरातील गुजराथी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री परेशभाई मेहता यांचा शिवसेनेत प्रवेश



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील पाटील

उरण नगरपालिकेची निवडणूक जशी-जशी जवळ येत आहे, तसे-तसे उरण शहरात राजकीय घडामोडी घडत आहेत, रविवार दिनाकं 17 ऑक्टोबर 2021 रोजी उरण शहरातील गुजराथी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री परेशभाई मेहता यांनी आपल्या कुटुंबासह *शिवसेना जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी *मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांनी श्री परेशभाई मेहता यांना भगवी शाल अर्पण करून व हाती शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

या वेळी *शिवसेना गटनेते  श्री गणेश शिंदे, शहर संपर्क प्रमुख श्री गणेश म्हात्रे,* नगरसेवक  समीर मुकरी, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अन्वर कुरेशी, विधानसभा अध्यक्ष एजाज  मुकादम, मा शहर संघटक  प्रवीण मुकादम, व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post